कवठा/बोळदे शेतशिवारात जमा करुन ठेवलेल्या धानाचा पुंजना जळून खाक झाला असुन त्यामुळे शेतक-याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार बोळदे येथील अल्पभूधारक शेतकरी प्रशांत रतीराम वालदे यांची शेती कवठा/बोळदे शिवारात आहे. त्यांनी सव्वा एकर शेतातील धानाची कापनी करुन पुंजना तयार करून ठेवला. मात्र सदर पुंजन्याला आग लागल्याने धानाचा पुजना जळून खाक झाला. त्यामुळे सदर शेतक-यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.