गोंदिया: जिल्ह्यात फार्म आयडी अपलोडिंग चे काम पूर्ण झाले असून नोंदणीला झाली सुरुवात
Gondiya, Gondia | Nov 27, 2025 खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना थंब मशीनवर अंगठा लावावा लागणार आहे. ओरड वाढल्यानंतर शुक्रवारी फार्मर आयडी अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले.त्यानंतर लगेच नोंदणीला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणीस प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून येत्या आठवडाभरात धान खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.