शिरपूर: तालुक्यातील हाडाखेड शिवारात ट्रकचालकाची गळफास घेऊन आत्महत्या;तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Nov 25, 2025 मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड शिवारात ट्रक चालकाने ट्रकला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालक व स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.मृत चालकाची ओळख रामकुमार भैयालाल जोशी वय 40, रा. रामनगर, गांधी रोड, शिवपुरी, मध्य प्रदेश अशी झाली आहे.