रामटेक: कालिदास स्मारक परिसर रामटेक येथे 'कार्तिक पहाट' कार्यक्रमातून स्वर संगीतात रंगले रामटेकवासी
Ramtek, Nagpur | Nov 4, 2025 कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवार दि. 4 नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता पासून कालिदास स्मारक रामटेक परिसरातील रंगमंचावर आयोजित 'कार्तिक पहाट ' या कार्यक्रमातून रामटेकच्या संगीत प्रेमी रसिकांना गीत,संगीत भजनांची मेजवानी मिळाली. प्रसिद्ध गायकांनी एकाहून एक सरस गीते गायली. काही समाजसेवकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने सेवानिवृत्त टी. एस. भाल, सुधाकर गायधनी, प्राचार्य अविनाश श्रीखंडे, योगीराज हॉस्पिटलचे श्री अग्रवाल, ज्योतीताई कोल्हेपरा प्रामुख्याने उपस्थित होते.