उल्हासनगर: उल्हासनगर मध्ये नशेखोर तरुणांचा धुमाकूळ, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नशेखोर तरुण दहशत वाजवताना पाहायला मिळत आहेत. उल्हासनगरच्या भगत कनवाराम चौक येथे नशेखर तरुणांनी रस्त्यावर पार केलेल्या गाड्यांची तोडफोड केली तसेच सोसायटीच्या आवारातील कुंड्या रस्त्यावर फेकून त्यांची देखील नासधूस केल्याची घटना समोर आली आहे. गाड्यांची तोडफोड करताना नशेखोर तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.