सद्गुरु सेवा आश्रम देऊळगाव माळी येथे साधत आहे भक्तीचा त्रिवेणी संगम. सद्गुरु सेवा आश्रम संत जनार्दन स्वामी महाराज पुण्यतिथी, गीता जयंती, व दत्त जयंती निमित्त देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे आश्रम चे संस्थापक अध्यक्ष बळीनाथ गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व गावकऱ्यांच्या सहकार्याने भक्तीचा त्रिवेणी संगम घडून येत आहे. 29 नोव्हेंबर पासून सप्ताह सुरुवात झाली यामध्ये कीर्तन, एकनाथी भागवत, संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, गीता जयंती, आरोग्य शिबिर, व आधी भरगच्च कार्यक्रम दिनांक 4 डिसेंबर पर्यंत होऊ घातले आहे. यासाठी आश्रम ची समस्त पदाधिकारी, गावकरी मंडळी, भजनी मंडळी परिश्रम घेत आहे.