परळी: पुढच्या वर्षी परळीची प्रगती लोकांच्या डोळ्यांसमोर उभी राहिल, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत नागरिकांना केले संबोधित
Parli, Beed | Nov 24, 2025 परळीमध्ये आगामी काळात विकासाची मोठी कामे प्रत्यक्षात दिसतील, असे आश्वासन माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी नागरिकांना संबोधित करताना दिले. "पुढच्या वर्षी परळीची प्रगती लोकांच्या डोळ्यांसमोर उभी राहिल," असा विश्वास व्यक्त करत त्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत माहिती दिली. मुंडे म्हणाले की, परळी तालुक्याच्या विकासासाठी अनेक कामे मंजूर झाली असून ती आता अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत. कृषी महाविद्यालय, पशुसंवर्धन कॉलेज, तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्णत्वाला येणार असल्या