खामगाव: नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने परवाना धारकांकडून शस्त्र जमा करणे सुरू
नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाय योजना करण्यात येत असून परवाना धारकांकडून शस्त्र जमा करण्याची कारवाई केली जात आहे. केवळ सुरक्षा रक्षक वगळता सर्व परवाना धारकांना पोलिस ठाण्यात शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये राजकीय पुढारी, व्यापारी तसेच शासकीय अधिकारी यांच्या कडून देखील शस्त्र जमा करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी दिली.