शिरूर: विसापुर-शिरुर एसटी वाहकाला मुजोर तरुणाची मारहाण
Shirur, Pune | Sep 17, 2025 विसापुर-शिरुर एसटी बस वाहकाला देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे इको कार चालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाहक संतोष बाळासाहेब थोपटे (वय ३६, रा.मोराची चिंचोली, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.