आज बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की,पडेगाव परिसरातील अतिक्रमण आज रोजी सकाळपासून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाडण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून सदर ठिकाणी मार्किंग करण्यात आली होती यानंतर अनेक नागरिकांनी आपल्या हाताने अतिक्रमण काढून घेतले होते ज्या नागरिकांनी अतिक्रमण काढले नाही त्यांचे अतिक्रमण आज रोजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाडण्यात आले आहे, सदरची कामगिरी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.