लातूर: लातूर पोलिसांची वाहतूक शिस्त मोहीम तीव्र,ऑटोरिक्षा, बुलेट, दुचाकी व चारचाकी वाहनांवर कडक कारवाई; जुने ई-चलान पूर्ण वसुल
लातूर – शहरात वाढत्या वाहतूक गोंधळाला आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलानव्दारे दंडात्मक कारवाई सुरु असून, शंभर टक्के थकलेले जुने दंड भरून घेण्यात येत आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू आहे.