बुलढाणा: मुंबई येथे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांची घेतली भेट
मुंबई येथे 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांची आमदार सिद्धार्थ खरात यांनी विशेष भेट घेऊन मेहकर लोणार मतदार संघात झालेल्या नुकसानीची मदत देण्यात यावी अशी मागणी केली.तसेच मतदार संघातील शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीची नुकसान, खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.