पाटण: ७५ ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारणार; किल्ले प्रतापगडाचा समावेश : मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
Patan, Satara | Sep 17, 2025 महाराष्ट्रात ७५ ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारण्यात येणार असून, यात शिशु कक्ष, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, वृद्धांसाठी केंद्र, बहुभाषिक सहाय्यता कक्ष यांचा समावेश आहे. पर्यटकांना आधुनिक आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहेत. या योजनेतील पहिली चार सुविधा केंद्रे रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि साल्हेर किल्ल्यावर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुंबई येथील मेघदूत या शासकीय निवासस्थानी बुधवारी पावणेबारा वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.