मोर्शी: मोर्शी चांदूरबाजार मार्गावरील ऊदखेड जवळ, संत्रा घेऊन जाणारा बोलेरो पिकप पलटी सुदैवाने जीवितहानी नाही
मोर्शी चांदूरबाजार मार्गावरील ऊदखेड गावाजवळ खामगाव वरून जबलपूर कडे संत्रा घेऊन जाणारा बोलेरो पिकप पलटी झाल्याची घटना दिनांक सहा नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता घडली असून, अचानक पणे रोही नावाचा जंगली प्राणी आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील चालकाचे संतुलन बिघडून हा अपघात झाला असल्याचे कळते. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वाहनातील संत्रा व वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे