परभणी: जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी
नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता जाहीर केला. यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा आणि सोनपेठ या सात नगरपालिकांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी मतदान २ डिसेंबरला, तर मतमोजणी ३ डिसेंबरला पार पडणार आहे.