अमरावती: चालक दिनानिमित्त पोलीस वाहनचालकांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते गौरव
देशपातळीवर साजऱ्या होत असलेल्या चालक दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर येथे १७ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोटर परिवहन विभागात कर्तव्य बजावताना शासकीय वाहनांचे योग्य मेन्टेनन्स, अपघातविरहित सेवा आणि इंधन बचतीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वाहनचालकांचा पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात एएसआय प्रमोद मडावी, एएसआय दिनेश नेमाडे, हेडकॉन्स्टेबल जगदीश कुरील, कॉन्स्टेबल राहुल मेहकरे, सुनिल कुसराम, केशव निकम, किशोर खेंगरे