पालघर: अल्पवयीन मुलाने डोक्यात मुसळ घालून वडिलांना केले ठार, मोखाडा येथील घटना
अल्पवयीन मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे घडली आहे शेरीचा पाढा येथे भगवान नवसू बर्तन यांचे कुटुंबीय राहते. वडील भगवान बर्तन दारू पिऊन धिंगाणा घालून आई व भावंडांना मारहाण करतात. याचा राग मनात धरून सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने घरातील मुसळीने वडिलांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्यांची हत्या केली आहेत. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन भिवंडी येथील बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.