नागपूर शहर: ऐन थंडीच्या दिवसात वाढल्या आग लागण्याच्या घटना सद्भावनानगर येथे कारला लागली आग ; सुदैवाने जीवितहानी नाही
एक डिसेंबरला मध्यरात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अजनी हद्दीतील सद्भावना नगर येथे एका कारला भीषण आग लागली या कारमध्ये पूर्णतः कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही तर कार चालक-मालक गणपती पारडीकर सुदैवाने बचावले. या दुर्घटनेत कार पूर्णतः जळून तब्बल पाच लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.