श्रीगोंदा: श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकावर अपहरण व खंडणी प्रकरणी गुन्हा
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकावर अपहरण व खंडणी प्रकरणी गुन्हा श्रीगोंदा – कापूस व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांच्याकडून तब्बल ३० लाख ३० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील सदस्यांची बैठक पार पडली. बैठकीदरम्यान काही सदस्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, संबंधित संचालकाविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा हेतुपुरस्सर अडकविण्याचा प्रयत्न असू शकतो.