कुही: विरखंडी शिवारात वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार, गाय गंभीर जखमी
Kuhi, Nagpur | Nov 1, 2025 ग्रामीण भागात असलेल्या विरखंडी शिवारात शेतावर बांधून ठेवलेल्या गाय व कालवडीवर वाघाने हल्ला केला. यामध्ये वाघाने कालवडीची शिकार केली. तर गाय गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की शेतकरी भोजराज पडोळे यांनी आपली जनावरे विरखंडी शिवारात शेतावर बांधून घराकडे गेले.दरम्यान वाघाने आधी काळवडीवर व नंतर गाईवर हल्ला केला. शेजारच्या शेतकऱ्यांनी व मजुरांनी आरडाओरडा केली. त्यामुळे वाघ निघून गेला. मात्र वाघाने कालवडीची शिकार केली.