हिंगणघाट: फुकटा येथील ५५ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत तरंगातांना आढळला मृत्यदेह
हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथील रहिवासी गोपाल तुळशीराम नक्षीने (वय ५५) यांचा फुकटा ते पिपरी मार्गावरील शेतात असलेल्या विहिरीत रंगवताना मृत्यदेह आढळल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता 'काड्या आणायला जातो' असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मात्र उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. दोन दिवसांच्या शोधानंतर एका विहिरीत त्यांचे शव तरंगताना आढळल्याची माहिती पोलीसाकडून प्राप्त झाली.