जळगाव जामोद: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रसेनजित पाटील यांची नियुक्ती, तहसील चौकात आतिशबाजी
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी प्रसेनजीत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांची नियुक्ती झाल्याने जळगाव जामोद पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जळगाव जामोद तहसील चौकात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले आहे.