आर्वी: नगरपालिका निवडणुकीत मुख्याध्यापक ड्युटीवर शाळा सांभाळणार कोण मुख्याध्यापक संघाचे निवडणूक अधिकारी यांना निवेदन
Arvi, Wardha | Nov 25, 2025 आर्वी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक खाजगी विद्यालयातील उच्चविद्यालयातील कर्मचारी व शिक्षकांच्या निवडणुकांमध्ये ड्युटी लावण्यात आल्या.. मात्र त्यात मुख्याध्यापकांनाही ड्युटीवर घेण्यात आले असल्यामुळे शाळा सांभाळणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे एकतर मुख्याध्यापकांना निवडणूक कामातून मुक्त करा किंवा सरसकट ड्युटी लागलेल्या शाळांना सुट्टी द्या अशा आशयाचे निवेदन आज दुपारी आर्वी तालुका माध्यमिक उच्च मा. शाळा मुख्याध्यापक संघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित डॉ सुकलवाड यांना दिले