राष्ट्रीय लोक अदालत १३ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दाखल व 'दाखलपूर्व' अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत.