बल्लारपूर: बल्लारपूरमध्ये झाली घरफोडी,६७ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास, हनुमान नगर येथील घटना
बल्लारपूर येथील हनुमान वार्ड, जुन्या बसस्टॉप परिसरात नीलोफर नबी शेख (३९) यांच्या घरातून ६७ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन ब्लूटूथची चोरी झाली आहे. बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर कलम ३०५ (अ) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार नीलोफर शेख आणि त्यांचे कुटुंब दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत.