नगर: बीडकरांसाठी रेल्वे सजवली; अहिल्यानगरच्या दिशेने प्रवास सुरू
स्वातंत्र्यपूर्व काळापासून बीडकरांचं स्वप्न असणारी रेल्वे आज अखेर बीडमधून अहिल्यानगरसाठी धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या रेल्वेचा प्रारंभ झाला. ही रेल्वे काही वेळात अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर येणार आहे.