बुलढाणा: महायुती सरकारने ९० दिवसांत २४ हजार कोटींच्या कर्जात बुडवून महाराष्ट्राचे दिवाळ काढलं - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ
शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर तसाच ठेवून, महायुती सरकारने अवघ्या ९० दिवसांत राज्याला २४ हजार कोटींच्या कर्जात बुडवून महाराष्ट्राचं दिवाळ काढलं. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं सोडून राज्यालाच कर्जबाजारी करणारे हे सरकार कोणत्या अच्छे दिना ची स्वप्ने दाखवत आहे? स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला कर्जाच्या खाईत लोटणारं हे सरकार खरंच शेतकऱ्यांचं सरकार आहे.