भंडारा: जिल्हा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने सालेबर्डी येथील कैद्याचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातील सालेबर्डी येथील एका कैद्याचा भंडारा जिल्हा कारागृहात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शंकर सदानंद लिल्हारे (वय ५४) असे मृत कैद्याचे नाव आहे. एका गुन्ह्यात आरोपी शंकर लिल्हारे यांना ८ जुलै २०२५ रोजी भंडारा जिल्हा कारागृहात आणण्यात आले होते. १७ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कारागृह अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र सकाळी १० वाजता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.