कराड: “वंदे मातरम् राष्ट्राभिमान जागवणारे गीत” : आ. डॉ. अतुलबाबा भोसले; वाठार येथे सामूहिक गायन
Karad, Satara | Nov 7, 2025 “वंदे मातरम् हे फक्त गीत नाही, तर स्वातंत्र्याची प्रेरणा आणि मातृभूमीचा अभिमान आहे,” असे भावनिक उद्गार भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी काढले. वंदे मातरम् गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक निमित्ताने भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्यावतीने कराड दक्षिण मतदारसंघातील वाठार येथे कृष्णा फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ‘वंदे मातरम् गौरव सामूहिक गायन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.