फलटण: फलटणमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी नागरिकांचा संताप; सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
फलटण, ३ नोव्हेंबर : फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.मोर्चाची सुरुवात फलटण न्यायालयापासून झाली आणि तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आला. दुपारी बारा वाजता सुरू झाला.