गोंडपिपरी तालुक्यातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्ह्यात एकूण ४३२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी संपूर्ण जिल्ह्यात १ ते ५ वर्गात ३५४ शिक्षकांची पदे रिक्त असून, गोंडपिपरी तालुक्यात ४५ पदे रिक्त आहेत. तसेच इयत्ता ६ ते ८ साठी संपूर्ण जिल्ह्यात ७८ शिक्षक, तर गोंडपिपरी तालुक्यात ५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.