रामटेक: वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस विभागातर्फे रामटेक शहरात निघाला रन फॉर युनिटी वॉक
Ramtek, Nagpur | Oct 31, 2025 देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशे व्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने रामटेक पोलीस स्टेशन तर्फे रामटेक शहरात शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबरला सकाळी सात वाजता पासून रन फॉर युनिटी वॉक चे आयोजन करण्यात आले होते. वाक चे नेतृत्व पोलीस निरीक्षक रामटेक अरविंद कतलाम यांनी केले. या वॉक मध्ये रामटेक पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी, सृष्टी सौंदर्य रामटेकचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.