चंद्रपूर: पत्नी व तिच्या प्रियकराने पतिला केले ठार हरदोना गावातील घटना
पत्नीला नेण्यासाठी चंद्रपुरात आलेल्या पतीला पत्नी व तिच्या प्रियकराने ठार केल्याची घटना ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता राजुरा तालुक्यातील हरदोना गावात घडली, पोलिसांनी या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. ३० वर्षीय राजेश नारायणलाल मेघवंशी राहणार भिलवाडा राजस्थान असे मृतकाचे नाव आहे.