पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त मा. श्री. योगेश म्हसे यांच्यासोबत आज मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंजूर झालेल्या आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व विकासकामांना तात्काळ सुरुवात करण्याबाबत तसेच मावळसाठी नवीन आवश्यक कामे मंजूर करण्याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा पार पडली.