दिग्रस: दुर्गाउत्सव शांततेत साजरा करण्याचे ठाणेदार मुंडे यांचे आवाहन, दिग्रस पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
आगामी दुर्गाउत्सव सण शांततेत, उत्साहात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून साजरा करावा, यासाठी दिग्रस पोलिस ठाण्याच्या प्रांगणात आज दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस ठाणेदार वैजनाथ मुंडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महावितरणचे अभियंता बालपांडे, शांतता समितीचे सदस्य, दुर्गाउत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.