अहिल्यानगर महापालिकाच्या मतदारयादीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदार टाकण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त लोकप्रतिनिधींच्या दबावात काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केला आहे. त्यांनी अहिल्यानगरमधील मतदारांसाठी 'आपला लढा' ही मोहीम हाती घेतली आहे.