वर्धा: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी कोटंबा येथे ग्रामसभेचे आयोजन
Wardha, Wardha | Sep 17, 2025 कोटंबा येथे ग्रामपंचायतमार्फत शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी ता. 17 बुधवारला दुपारी 12 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अभियानाच्या प्रसिद्धीसाठी आदल्या दिवशी बचत गटातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढली. तसेच दवंडी देऊन ग्रामस्थांना ग्रामसभेसाठी आमंत्रित करण्यात आले.