उदगीर: काँग्रेस,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेच्या विरोधात आपली लढाई,एमआयएमचे हैदराबादचे आमदार माजिद हुसेन
Udgir, Latur | Nov 30, 2025 उदगीर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा, शिवसेना,एमआयएम पक्ष रिंगणात उतरले असून उदगीर नगरपालिका निवडणूक ही चुरशीची होणार आहे,२९ नोव्हेंबर रोजी रात्री उदगीर येथे एमआयएम पक्षाची जाहीर सभा पार पडली या सभेत हैदराबादचे एमआयएम पक्षाचे आमदार माजिद हुसेन यांनी आपली लढाई भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना यांच्या विरोधात असून सर्वात जास्त मुस्लिम समाजाचा कोणी फायदा घेतला असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतल्याचे त्यांनी आवर्जून बोलताना सांगितले