महागाव: तालुक्यातील करंजखेड येथील दारु बंदीसाठी महिलांची महागाव पोलीस ठाण्यावर धडक
महागाव तालुक्यातील करंजखेड येथील महिलांनी गावात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या दारु विक्री विरोधात महागाव पोलीस ठाण्यावर आज दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान धडक दिली. त्यांनी गावात दारूबंदी करण्याची मागणी केली. महागाव तालुक्यातील करंजखेड गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री फोफावल्याने महिलांनी या विरोधात आवाज उठवला. अनेक कुटुंबांवर याचा परिणाम होत असून, महिलांनी याविरोधात एकत्र येऊन संदीप ठाकरे यांच्या नेतृत्वात महागाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.