पालघर: जीवननगर येथे हरे कृष्णा निशुल्क स्मार्ट अभ्यासिका उपक्रमाचा आमदार स्नेह दुबे पंडित यांच्या हस्ते शुभारंभ
वसईतील जीवननगर - गोराईपाडा येथे स्वामी विवेकानंद सेवा संस्था यांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत हरेकृष्ण निशुल्क स्मार्ट अभ्यासिका उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना उपक्रम सुरू करण्यात आला आहे.