उदगीर: उदगिरात संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Udgir, Latur | Nov 26, 2025 संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर शहरातील भारतरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गतीशील विचारांना स्मरुन सर्व मानव जातीला जीवन जगण्याची नवी प्रेरणा देणाऱ्या संविधान दिनानिमित्त समाज बांधवांसोबत उपस्थित राहून वंदन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व मानव जातीचे मुक्तिदाता होते. असे मत आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले