त्र्यंबकेश्वर: पळशी येथे बजरंग बली गाव विकास समितीच्या वतीने स्वदेश फाऊंडेशन सुक्ष्म नियोजन आराखडा कार्यक्रम पडला पार
बजरंग बली गाव विकास समिती , ग्रामपंचायत व स्वदेश फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण विकासाच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन आराखडा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आलेल्या मान्यवरांचे पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील अबालवृद्ध मोठया संख्येने सहभागी झाले होते.