रामटेक: न. प.रामटेकची निवडणुक भाजप स्वबळावर लढणार; युती झाल्यास अध्यक्ष व 75% सदस्य पदावर भाजपाचा दावा करणार
Ramtek, Nagpur | Nov 11, 2025 आगामी दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपरिषद रामटेक च्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात शहरात विविध चर्चेला उधान आले असतानाच रामटेक नगर परिषद ची निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपाचे वरिष्ठ नेता तथा माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता भाजपाचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे आयोजित पत्र परिषदेत दिली. तर वरिष्ठांकडून युती झाल्यास भाजपाचा अध्यक्षपदावर दावा कायम राहणार असून 75% सदस्यांची जागा ही भाजप मागणार आहे.