जामखेड तालुक्यात एमआयडीसी मंजूर करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आज आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी तातडीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.