भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘श्रद्धाभूमी’ नया अकोला (वलगाव-चांदूर बाजार रोड) येथील स्मारकावर आज भीमअनुयायांचा जनसागर लोटला. राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री तथा माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी आयोजित या ‘अभिवादन यात्रे’ने परिसरात एक वेगळेच चैतन्य निर्माण केले. या भव्य यात्रेत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांना विशेष बळ मिळाले.