मोहाडी: करडी येथे धारदार शस्त्र लपविणाऱ्या आरोपी विरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील करडी येथे दि. 8 नोव्हेंबर रोज शनिवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास करडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सचिन अशोक ठवकर वय 32 वर्षे, रा. करडी, ता. मोहाडी याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक लोखंडी धारदार तलवार आढळली. सदर तलवार कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने मिळून आल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.