उदगीर: उदगीर लातूर प्रवासा दरम्यान चालक पूर्णवेळ मोबाईलवर बोलण्यात गुंग, प्रवाशाने रेकॉर्ड केला व्हिडीओ
Udgir, Latur | Nov 29, 2025 एसटी बस गळतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता एक नवीन धक्कादायक व्हिडीयो समोर आला आहे. उदगीर ते लातूर जाणारी विना थांबा एसटीचालक प्रवासादरम्यान २८ नोव्हेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता पूर्णवेळ फोन वर बोलत गाडी चालवत असतानाचा व्हिडीओ प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. एवढ्या वरच न थांबता प्रवाशाने चालकाला जाब सुद्धा विचारल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भरलेल्या बस मधील 25 ते 30 प्रवाशांचे जीव धोक्यात घालून गाडी चालवणाऱ्या चालकांवर कारवाई होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे