ठाणे: महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार :खासदार नरेश मस्के
Thane, Thane | Nov 11, 2025 महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आता वेगवेगळ्या पक्षात फोडाफोडी सुरू आहे भाजपने देखील शिवसेना शिंदे गटाचे काही नगरसेवक फोडले आहेत तर शिवसेना शिंदे गटाने देखील भाजपचे काही नगरसेवक पडले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये हा वाद मोठा आहे,मात्र कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर तीन तारखेला कोणाची ताकद किती आहे हे कळणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली.