खेड: आळंदी यात्रेसाठी एसटीच्या जादा गाड्या
कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भाविकांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ३२० जादा गाड्या सोडणार आहे.१२ ते १८ नोव्हेंबर दरम्यान स्वारगेट, देहूगावासह पुणे जिल्ह्यातील विविध आगारांमधून या गाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.