आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता रिपब्लिकन सेना सोयगाव तालुका अध्यक्ष अंकुश पगारे यांनी माध्यमांना माहिती दिली की सोयगाव शेंदुर्णी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून या ठिकाणी रोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे तर अनेकांना या ठिकाणी अपंगत्व आले आहेत मात्र संबंधित ठेकेदार तसेच खासदार आमदार या बाबीकडे दुर्लक्ष करत असून सदरील रस्ता नाही झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे